अजित पवार भावी मुख्यंमत्री ! राष्ट्रवादीच्या मुंबई कार्यालयाबाहेर बॅनरबाजी; काय आहे प्रकार?

अजित पवार भावी मुख्यंमत्री ! राष्ट्रवादीच्या मुंबई कार्यालयाबाहेर बॅनरबाजी; काय आहे प्रकार?

| Updated on: Feb 21, 2023 | 6:18 PM

VIDEO | एकीकडे शिंदे-फडणवीस सरकार कोसळण्याच्या चर्चा तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार भावी मुख्मंत्री असल्याची जोरदार बॅनरबाजी, बघा काय आहे प्रकार

मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वी जयंत पाटील हे भावी मुख्यमंत्री असे बॅनर्स लागले होते. तर आज मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाच्या बाहेर अजित पवार भावी मुख्यमंत्री असे बॅनर्स झळकल्याचे पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून होणाऱ्या बॅनरबाजीची राज्यात जोरदार चर्चा सुरु आहे. या बॅनर्सवर भावी मुख्यमंत्री म्हणून अजित पवार असा उल्लेख आहे. महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री, एकच दादा, अजित दादा असा मजकूर त्यावर लिहिलेला आहे. तर गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईत मलबार हिल भागात पोस्टर्स लागले होते. त्यावर जयंत पाटील यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा केला होता.

Published on: Feb 21, 2023 06:18 PM