Special Report | अजितदादा फडणवीसांना म्हणतात..काडी टाकू नका
कर्ज आणि निवृत्ती वेतनसाठी पैसे खर्च होतात. सरकार आणण्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय. पण, त्यासाठी काडी टाकू नका, असं अजित पवार म्हणाले.
निधी वाटपावरुन अजित पवार यांना देवेंद्र फडणवीस यांनी चिमटे काढले होते. काँग्रेस आणि शिवसेना कमी निधी दिल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. आता अजित पवार यांनी उत्तर दिलं आहे. निधी वाटपावरुन महाविकास आघाडीमध्ये काडी टाकू नका, असं प्रत्युत्तर अजित पवार यांनी दिलं आहे. कर्ज आणि निवृत्ती वेतनसाठी पैसे खर्च होतात. सरकार आणण्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय. पण, त्यासाठी काडी टाकू नका, असं अजित पवार म्हणाले. सरकार चालवण्यासाठी भेदभाव करुन चालत नाही, असं देखील ते म्हणाले.
Latest Videos