Ajit Pawar LIVE | पुणे जिल्हा समितीची 793 कोटींच्या प्रारूप आराखड्याला मंजुरी
आज सकाळी 9 वाजल्यापासून जिल्हा वार्षिक योजना 2022-23 या बद्दलची बैठक घेतली. कार्यकारी समितीची बैठक घेतल्यानंतर जिल्हा नियोजन समितीची बैठक आमदार खासदार यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.
आज सकाळी 9 वाजल्यापासून जिल्हा वार्षिक योजना 2022-23 या बद्दलची बैठक घेतली. कार्यकारी समितीची बैठक घेतल्यानंतर जिल्हा नियोजन समितीची बैठक आमदार खासदार यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. त्यानंतर डोंगरी विकास संदर्भातील बैठक पार पडली. त्यानंतर कोरोना आढावा बैठक पार पडली. जिल्हा वार्षिक योजनेच्या संदर्भात साधारण 2022-23 साठी नियोजन विभागानं 619 कोटी रुपयांच्या प्रारुप आराखड्याला मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये सर्वसाधारण योजना बसवण्याचा प्रयत्न केला आहे. 128 कोटी अनुसूचिता जातीसाठी तर एसटी साठी 45 कोटी 83 लाख रुपयं, अशा 793 कोटी 86 लाख रुपयांच्या प्रारुप आराखड्याला जिल्हा नियोजन समितीनं मान्यता दिलेली आहे. 2021-22 जे आर्थिक वर्ष 2022 ला संपणार आहे. त्या जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा घेण्यात आला. 795 कोटींची तरतूद होती त्यापैकी 41 टक्के रक्कम खर्च करण्यात आली आहे. 31 मार्च पर्यंत उर्वरित रक्कम होईल, असं नियोजन सर्वांनी मिळून केलंलं आहे.