ना इकडे, ना तिकडे... पिता-पुत्रांचीच युती? झिरवळ म्हणताय, सांगायचं इकडं अन् जायचं तिकडं आम्ही त्यातले

ना इकडे, ना तिकडे… पिता-पुत्रांचीच युती? झिरवळ म्हणताय, सांगायचं इकडं अन् जायचं तिकडं आम्ही त्यातले

| Updated on: Jul 30, 2024 | 11:31 AM

झिरवळ पिता-पुत्रांचं राजकारण सध्या सर्वसामान्यांना समजण्यापलिकडे गेले आहे. वडील अजित पवार यांच्या सोबत आहे. तर पुत्र शरद पवार यांच्या मंचावरून आणा-बाका घेतोय. वडील झिरवळ यांच्या मते त्यांचा पुत्र आज्ञाधारक आहे. पोरगा मात्र मविआतून लढण्याची इच्छा वर्तवतोय

दिंडोरीतून अजित पवार गटाचे नरहरी झिरवळ यांचं नाव विधानसभेसाठी जाहीर केलंय. दुसरीकडे त्यांचे पुत्र गोकुळ झिरवळ तिकीटासाठी शरद पवार यांच्या राष्ट्रावादीच्या मंचावर गेले आहेत. मात्र गट-तट आणि पक्षाच्या वादात झिरवळ पिता-पुत्रांचीच युती झाली आहे का? असा सवाल सध्या चर्चेत आहे. त्यामुळे झिरवळ पिता-पुत्रांचं राजकारण सध्या सर्वसामान्यांना समजण्यापलिकडे गेले आहे. वडील अजित पवार यांच्या सोबत आहे. तर पुत्र शरद पवार यांच्या मंचावरून आणा-बाका घेतोय. वडील झिरवळ यांच्या मते त्यांचा पुत्र आज्ञाधारक आहे. पोरगा मात्र मविआतून लढण्याची इच्छा वर्तवतोय. झिरवळ म्हणतात मी कधीच गद्दारी केली नाही. मात्र मुलांच्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले आम्ही सांगतो एकीकडे आणि जातो दुसरीकडे… असं आमचं राजकारण आहे, असं झिरवळ म्हणाले.

Published on: Jul 30, 2024 11:31 AM