देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर माढ्यातील बंड थंड? जानकर महायुतीत अन् रामराजेंची भूमिका मवाळ?
अजित पवार गटातील उमेदवार रामराजे निंबाळकर हे भाजपचे उमेदवार रणजितसिंह यांच्या विरोधात होते. कोणत्याही स्थितीत त्यांना उमेदवारी न देण्याचा इशारा रामराजे निंबाळकर यांनी दिला होता. मात्र अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एक बैठक झाली.
देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने माढ्यातील बंडाची चर्चा थंड झाली आहे. महादेव जानकर हे महायुतीतून लढणार असून रामराजे निंबाळकरांची भूमिका मवाळ झाल्याचे बोलले जात आहे. अजित पवार गटातील उमेदवार रामराजे निंबाळकर हे भाजपचे उमेदवार रणजितसिंह यांच्या विरोधात होते. कोणत्याही स्थितीत त्यांना उमेदवारी न देण्याचा इशारा रामराजे निंबाळकर यांनी दिला होता. मात्र अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एक बैठक झाली. त्यानंतर रामराजे निंबाळकर यांचा सूर बदलल्याचे चित्र आहे. दुसरीकडे रासपचे नेते महादेव जानकर भाजपविरोधात लढण्याचा इशारा दिला होता. दरम्यानच्या काळात ते महायुतीची साथ सोडून ते महाविकास आघाडीत जाण्याचाही चर्चा रंगल्यात. मात्र जानकर वर्षा बंगल्यावर प्रकटले आणि जानकर यांच्या बंडाची तलवार उपसण्याआधी म्यान झाली आहे. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट