बाहेरचा उंदीर गरळ ओकतोय, विजय शिवतारेंवर रुपाली ठोंबरे पाटलांची जहरी टीका
बाहेरचा उंदीर विजय शिवतारे गरळ ओकत आहे. त्यांना नक्कीच पवारांच्या घरातून कुणाचं तरी पाठबळ असल्याशिवाय राहणार नाही, असे वक्तव्य करत अजितदादा गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांच्यावर जहरी टीका केली...
बाहेरचा उंदीर विजय शिवतारे गरळ ओकत आहे. त्यांना नक्कीच पवारांच्या घरातून कुणाचं तरी पाठबळ असल्याशिवाय राहणार नाही, असे वक्तव्य करत अजितदादा गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांच्यावर जहरी टीका केली आहे. त्या पुढे असेही म्हणाल्या की, कुणाचं तरी पाठबळ आहे. अन्यथा त्या शिवतारे यांची एवढी हिम्मत होणार नाही. शिवतारे यांना सुद्धा जशास तसे उत्तर देऊ, असा इशाराही रुपाली ठोंबरे पाटील यांनी दिला आहे. तर अजित पवार यांनी स्वतःच्या कामाने स्वत:ला सिद्ध केलं आहे. तुमच्या पोटातील विष आता बाहेर पडत आहे, असे म्हणत त्यांनी विजय शिवतारे अजित पवार यांच्यावर करत असलेल्या टीकेवर प्रत्युत्तर दिलंय.
Published on: Mar 25, 2024 11:02 PM
Latest Videos