दिलीप वळसे पाटील यांचा शरद पवार यांच्या नेतृत्वावर सवाल, नंतर घुमजाव!
VIDEO | अजित पवार गटाचे मंत्री दिलीप वळसे पाटलांनी केला शरद पवारांच्या नेतृत्वावरच सवाल, 'पवारांच्या नेतृत्वात एकदाही बहुमत मिळालं नाही आणि राष्ट्रवादीचा एकदाही मुख्यमंत्री झाला नाही'
मुंबई, २१ ऑगस्ट २०२३ | राष्ट्रवादीतही फूट पडल्यानं शरद पवार गटाची लढत अजित पवार गटाशीच होणार आहे. त्यामुळं शरद पवारांकडून हल्लाबोल सुरु झालाय. मात्र आता अजित पवार गटाचे मंत्री, दिलीप वळसे पाटलांनी पवारांच्या नेतृत्वावरच सवाल उपस्थित केला. शरद पवारांच्या नेतृत्वात एकदाही बहुमत मिळालं नाही आणि राष्ट्रवादीचा एकदाही मुख्यमंत्री झाला नाही, असं अजित पवार गटाचे मंत्री, दिलीप वळसे पाटील म्हणाले आणि शरद पवार गटाचे नेते आक्रमक झाले. वळसे पाटलांनी शरद पवारांच्या नेतृत्वावरच सवाल उपस्थित केला..त्यामुळं आव्हाडांपासून ते रोहित पवारांनीही वळसे पाटलांचा समाचार घेतला.वळसे पाटील सरंजाम विचारणीचे असून, बिळात लपलेले नाग, असल्याची जहरी टीका आव्हाडांनी केली. दिलीप वळसे पाटील सध्या, अजित पवार गटात आहेत. शरद पवारांचे पीए ते मंत्री असा त्यांचा राष्ट्रवादीचा प्रवास राहिलाय. दिलीप वळसे पाटील आधी शरद पवारांचे पीए होते. 199 0मध्ये पहिल्यांदा काँग्रेसच्या तिकीटावर आंबेगावमधून विधानसभेची निवडणूक लढली आणि आमदार झाले, तेव्हापासून या मतदारसंघातून तेच आमदार आहेत. 1999मध्ये पवारांनी राष्ट्रवादीची स्थापना केली त्यावेळी त्यांच्यासोबत गेले. 2004 मध्ये आघाडी सरकारमध्ये पवारांनी वळसे पाटलांना उर्जा आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री केलं. 2009-2014 पर्यंत विधानसभेचे अध्यक्ष राहिले. महाविकास आघाडी सरकारमध्ये अनिल देशमुख जेलमध्ये गेल्यानंतर गृहमंत्रीपदही शरद पवारांनी वळसे पाटलांनाच दिलं. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट