जीवाचं रान करून निवडून आणलं, पण 5 वर्षात चहासुद्धा पाजला नाही; अमोल कोल्हेंना कुणाचा टोला?
मागच्या वेळी डॉ अमोल कोल्हे यांच्यासाठी जिवाचं रान केलं. त्यांना निवडूनही आणलं. पण मला त्यांनी पाच वर्षात चहा सुद्धा पाजला नाही अशा शब्दात टोमणा मारलाय. तर खासदाराने संसदेत प्रश्न मांडण्यापेक्षा जनतेच्या दैनंदिन अडचणी समजून घ्यायला हव्यात असं म्हणत मोहिते पाटलांनी कोल्हेंच्या संसदेतील भाषणावर सुद्धा टिपण्णी केलीय.
शिरूर लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांच्या प्रचाराची खेड तालुक्यात धुरा सांभाळनारे अजित पवार गटाचे खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी डॉ.अमोल कोल्हेवर निशाणा साधलाय. मागच्या वेळी डॉ अमोल कोल्हे यांच्यासाठी जिवाचं रान केलं. त्यांना निवडूनही आणलं. पण मला त्यांनी पाच वर्षात चहा सुद्धा पाजला नाही अशा शब्दात टोमणा मारलाय. तर खासदाराने संसदेत प्रश्न मांडण्यापेक्षा जनतेच्या दैनंदिन अडचणी समजून घ्यायला हव्यात असं म्हणत मोहिते पाटलांनी कोल्हेंच्या संसदेतील भाषणावर सुद्धा टिपण्णी केलीय. लोकांनी आम्हाला आमदार खासदार केलं, त्यामुळे संसदेत आणि विधानसभेत प्रश्न मांडले तर आम्ही उपकार करत नाही. तुम्ही संसदेत प्रश्न मांडले, मी विधानसभेत मांडले, लोकांनी प्रश्न मांडण्यासाठी निवडून दिलंय. त्यामुळे आपण उपकार करत नाही. अशा शब्दात मोहिते पाटीलांनी कोल्हेंना जबाबदारीची जाणीव करुन दिल्याचे पाहायला मिळत आहे.