'त्या' इशाऱ्यानंतर सुनील शेळके यांचं शरद पवार यांना चॅलेंज; म्हणाले, '... अन्यथा राज्यभर सांगणार'

‘त्या’ इशाऱ्यानंतर सुनील शेळके यांचं शरद पवार यांना चॅलेंज; म्हणाले, ‘… अन्यथा राज्यभर सांगणार’

| Updated on: Mar 07, 2024 | 5:06 PM

कार्यकर्त्यांना दमदाटी केल्यावरून शरद पवारांनी सुनील शेळके यांना इशारा देत चांगलंच सुनावलं आहे. शरद पवार यांनी सुनील शेळके यांना इशारा दिल्यानंतर शेळके यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. इतकंच नाहीतर सुनील शेळके यांनी थेट पवार यांनाच आव्हान दिलं आहे.

मुंबई, ७ मार्च २०२४ : मेळाव्याला येऊ नये, म्हणून कार्यकर्त्यांना दमदाटी केल्यावरून शरद पवारांनी सुनील शेळके यांना इशारा देत चांगलंच सुनावलं आहे. ‘सुनील शेळके तू आमदार कोणामुळं झाला? तुझ्या सभेला कोण आलं होतं? पक्षाचा अध्यक्ष कोण होतं? तुझ्या त्या अर्जावर माझी सही आहे. हे लक्षात ठेवं. मला शरद पवार म्हणतात, हे विसरू नका. मी त्या वाटेने जात नाही, पण गेलो तर मी कोणाला सोडत नाही’, असा थेट इशारा पवारांनी दिला. या इशाऱ्यानंतर सुनील शेळकेंनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आणि ते म्हटले, कुणाला दम दिला? एक तरी व्यक्ती आणून दाखवा, असे म्हणत अजित पवार गटातील आमदार सुनील शेळके यांनी शरद पवार यांना थेट आव्हान दिलं आहे. शरद पवार यांनी पुरावे द्यावेत. अन्यथा सर्व आरोप खोटे केल्याचे राज्यभर सांगणार असल्याचाही इशारा आमदार सुनील शेळके यांनी शरद पवार यांना दिला.

Published on: Mar 07, 2024 05:06 PM