Ajit Pawar : आगामी विधानसभेत अजितदादा महायुतीतच राहणार की स्वगृही परतणार? आमदारांमध्ये अस्वस्थता का?
अजित पवार गटात लोकसभा निकालानंतर अस्वस्थता निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. अनेक आमदार संपर्कात असल्याचा दावा विरोधकांकडून होतोय. तर अजित पवार गटाने त्या दाव्यात तथ्य नसल्याचे म्हटले आहे. मात्र आगामी विधानसभेत अजित पवार हे महायुतीत असणार की नाही?
लोकसभा निवडणुकीच्या ९ महिन्यांपूर्वी विरोधी बाकांवर गेलेल्या अजित पवार गटात लोकसभा निकालानंतर अस्वस्थता निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. अनेक आमदार संपर्कात असल्याचा दावा विरोधकांकडून होतोय. तर अजित पवार गटाने त्या दाव्यात तथ्य नसल्याचे म्हटले आहे. मात्र आगामी विधानसभेत अजित पवार हे महायुतीत असणार का? यावरून अनेक तर्क-वितर्क लढवले जातायत. लोकसभेत महायुतीत एकमेकांना ट्रान्सफर न झालेली मतं, पक्ष फोडाफोड आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरून जनतेने दिलेला कौल, लोकसभेला चारच जागा मिळाल्याने महायुतीमध्ये विधानसभेला संधी मिळणार की नाही? याची चिंता या कारणांमुळे अजित पवार गटात अस्वस्थता निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. पराभवाच्या चिंतनासाठी निकालानंतर अजित पवार यांनी बैठक बोलावली होती. अजित पवारांच्या या बैठकीला ४ आमदार अनुपस्थित होते. यांनी बैठकीला का गैरहजेरी लावली? नेमकी कारणं काय? की अजित पवारांचे आमदार पक्षात नाराज? बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट