विरोधकांवर टीका करणाऱ्या अमोल मिटकरींमधला गायक पाहिलाय का? बघा कोणतं गाणं गायलं?
अकोल्यातील न्यु तोष्णीवाल लेआऊट भागातील आयोजित केलेल्या भजनसंध्या कार्यक्रमात अमोल मिटकरी यांनी गाणं गायलं. मिटकरी यांनी 'माऊलीची माया माझी, भीमरावराया' हे भीमगीत आपल्या पहाडी आवाजात सादर केलं आहे, बघा व्हिडीओ
सध्या राज्यभरात गणोशोत्सवाचा एकच उत्साह पाहायला मिळत आहे. घरोघरी लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन झाले आहे. गणपती बाप्पाच्या येण्याने वातावरणात वेगळंच चैतन्य निर्माण झालं आहे. अशातच राजकीय नेते मंडळींनी देखील आपल्या घरात लाडक्या बाप्पाला विराजमान केलं आहे. अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे नेते, आमदार अमोल मिटकरी यांनी देखील आपल्या घरात लाडक्या बाप्पाची स्थापना केली आहे. अमोल मिटकरी यांच्या बाप्पाच्या देखाव्याची थीम म्हणजे गुलाबी रिक्षा योजना, वर्षाला 3 गॅस सिलेंडर म्हणजे अन्नपुर्ण योजना, वारकरी संप्रदाय योजना, लेक लाडकी योजना अशा अनेक योजना या देखाव्यात पाहायला मिळत आहेत. नेहमीच विरोधकांवर टीका करणारे अमोल मिटकरी हे गणेशोत्सवाच्या निमित्ताने गायकाच्या भूमिकेत पाहायला मिळाले. बघा मिटकरींच्या गाण्याचा व्हिडीओ
Published on: Sep 10, 2024 05:33 PM
Latest Videos