‘घड्याळ’ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, मग अजितदादांच्या वृत्तपत्रातील जाहिरातीत काय म्हटलंय?
गेल्या काही दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या गटाला घड्याळ हे चिन्ह वापरताना काही सर्वोच्च न्यायालयाने काही अटी लागू केल्या होत्या. त्यानुसार, निवडणूक चिन्हाबाबत अजित पवार गटाकडून वृत्तपत्रात ही नवी जाहिरात आता प्रसिद्ध केली जात आहे. काय म्हटलंय या जाहिरातीत, बघा व्हिडीओ....
येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक चिन्हाबाबत अजित पवार गटाकडून वृत्तपत्रात पुन्हा जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीत ‘घड्याळ’ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या गटाला घड्याळ हे चिन्ह वापरताना काही सर्वोच्च न्यायालयाने काही अटी लागू केल्या होत्या. त्यानुसार, निवडणूक चिन्हाबाबत अजित पवार गटाकडून वृत्तपत्रात ही नवी जाहिरात आता प्रसिद्ध केली जात आहे. या जाहिरातीत असे म्हटले की, भारत निवडणूक आयोगाने अजित अनंतराव पवार यांच्या नेतृत्वाखालील नॅशनालिस्ट (राष्ट्रवादी) काँग्रेस पार्टीला घड्याळ हे चिन्ह दिले आहे. हे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयासमोर न्याय प्रविष्ट आहे. अंतिम निकालाच्या आधीन राहून सर्वोच्च न्यायालयाने मध्यंतरी नॅशनालिस्ट (राष्ट्रवादी) काँग्रेस पार्टीला आगामी सर्व निवडणुकांसाठी घड्याळ हे चिन्ह वापरण्याची परवानगी दिली आहे, असे अजित पवार गटाकडून वृत्तपत्रात देण्यात येत असलेल्या जाहिरातीत म्हटले आहे.