Ajit Pawar गटाचा शरद पवारांच्या नियुक्तीवर सवाल? सुनावणीत काय झाला आक्रमक युक्तिवाद?

Ajit Pawar गटाचा शरद पवारांच्या नियुक्तीवर सवाल? सुनावणीत काय झाला आक्रमक युक्तिवाद?

| Updated on: Oct 10, 2023 | 11:16 AM

tv9 Special report | शरद पवारांची निवड बेकायदेशीर, पवारांची अध्यक्षपदावरील निवड पक्ष घटनेला धरुन नाही आणि शरद पवारांनी घर चालवलं तसा पक्ष चालवला, सर्व नियम पायदळी तुडवले असल्याचा अजित पवार गटानं केला शरद पवार यांच्यावर आरोप, बघा सुनावणीत कसा झाला युक्तीवाद?

मुंबई, १० ऑक्टोबर २०२३ | निवडणूक आयोगात झालेल्या दुसऱ्या सुनावणीत अजित पवार गटानं शरद पवारांच्या नियुक्तीवर सवाल केला. पवारांची निवडच बेकायदेशीर असून घर चालवतात तसं पवार पक्ष चालवायचे, असा युक्तिवाद अजित पवार गटाकडून झालाय. राष्ट्रवादी कोणाची, यावर युक्तिवाद करताना सलग दुसऱ्या सुनावणीतही अजित पवार गटानं शरद पवारांच्या अध्यक्षपदाच्या नियुक्तीवरच आक्षेप घेतला. शरद पवारांची निवड बेकायदेशीर असून निवडणूक घेऊन झालेली नाही. पवारांची अध्यक्षपदावरील निवड पक्ष घटनेला धरुन नाही. शरद पवारांनी घर चालवलं तसा पक्ष चालवला, सर्व नियम पायदळी तुडवले, असे म्हटले तर अजित पवार गटाचा युक्तिवाद खोडून काढताना शरद पवार गटाकडून अॅड. अभिषेक मनू सिंघवींनी म्हटलंय की, पक्षांतर्गत निवड करताना कोणीही आक्षेप घेतला नाही किंवा दावे केले नव्हते. अजित पवार गटाकडे किती आमदार आहेत, त्यांचा आकडा अद्याप स्पष्ट नाही, अजित पवार गटासोबत असलेल्या सदस्यांचा आकडा तपासावा असे म्हटले आहे.

Published on: Oct 10, 2023 11:16 AM