अजित पवार यांनाच राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर काढलंय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
राष्ट्रवादीच्या स्थापनेपासूनचा सदस्य असल्याने आपण अजित पवारांनाच पक्षातून काढू शकतो. त्यात अडचण नाही, असे खळबळजनक वक्तव्य उत्तम जानकर यांनी केले आहे. उत्तम जानकर यांच्या वक्तव्यानंतर एकच चर्चांना उधाण आलं आहे.
अजित पवार यांनी ज्या पद्धतीने शरद पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून काढले. तशाच पद्धतीने आपण राष्ट्रवादीच्या स्थापनेपासूनचा सदस्य असल्याने आपण अजित पवारांनाच पक्षातून काढू शकतो. त्यात अडचण नाही, असे खळबळजनक वक्तव्य उत्तम जानकर यांनी केले आहे. उत्तम जानकर यांच्या वक्तव्यानंतर एकच चर्चांना उधाण आलं आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटात सध्या उत्तम जानकर आहेत. पण त्यांनी माढा मतदार संघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना पाठिंबा दिला आहे. यावेळी सुनेत्रा पवार यांचा पराभव झाल्यावर आपण पक्ष सोडू, असे विधान जानकर यांनी केले होते. यावर त्यांना विचारले असता. आपल्याला पक्षातून अजून कुणी काढून टाकले नाही. पण आपण स्थापनेपासूनच राष्ट्रवादीचा सदस्य असल्याने अजित पवारांना काढू शकतो, असे विधान उत्तम जानकर यांनी केल्याने नव्या वादाला तोंड फुटणार असल्याची शक्यता दिसतेय.