सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच अजितदादांनी भरला डमी अर्ज
शरद पवार यांच्या बारामती लोकसभा मतदारसंघात यंदा पवार कुटुंबातच चढा-ओढ निर्माण झालीये. पवार कुटुंबातच नणंद-भावजय यांच्यात लढत पाहायला मिळणार असून या निमित्ताने भावकीचा वादही सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच अजित पवार यांनी बारामतीसाठी डमी अर्ज भरला आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघ लोकसभा निवडणुका घोषित झाल्यापासून चर्चेत आहे. शरद पवार यांच्या बारामती लोकसभा मतदारसंघात यंदा पवार कुटुंबातच चढा-ओढ निर्माण झालीये. पवार कुटुंबातच नणंद-भावजय यांच्यात लढत पाहायला मिळणार असून या निमित्ताने भावकीचा वादही सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. तर शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे यांना लोकसभेचं तिकीट देण्यात आलंय. अजित पवार यांच्याकडून त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासाठी जोरदार प्रचार सुरूये तर शरद पवार यांच्याकडून त्यांची मुलगी सुप्रिया सुळे यांचा जंगी प्रचार सुरू आहे. अशाचत सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल केल्यानंतर अजित पवार यांनी बारामतीसाठी डमी अर्ज भरला आहे. तर खबरदारी म्हणून अजित पवारांनी डमी उमेदवारी अर्ज भरला असल्याची माहिती मिळतेय तर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासह विजय शिवतारे यांच्या उपस्थितीत दादांनी हा डमी अर्ज भरला आहे.