‘मी जाहिरातबाजी करणारा नेता नाही’; अजित पवार यांचा अप्रत्यक्ष शिंदे – फडणवीस यांच्यावर निशाना
आपल्या शपथविधीनंतर तिसऱ्या शासन आपल्या दारी कार्यक्रमात हजेरी लावली. नाशिकमध्ये हा कार्यक्रमात आयोजित करण्यात आला होता. यावेळी अजित पवार यांचे जोरदार स्वागत नाशिकमध्ये करण्यात आले.
नाशिक : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्तेत येताच आपल्या कामांचा धडका सुरू केला आहे. त्यांनी आज आपल्या शपथविधीनंतर तिसऱ्या शासन आपल्या दारी कार्यक्रमात हजेरी लावली. नाशिकमध्ये हा कार्यक्रमात आयोजित करण्यात आला होता. यावेळी अजित पवार यांचे जोरदार स्वागत नाशिकमध्ये करण्यात आले. याचदरम्यान अजित पवार यांनी जाहिरातबाजीवरून मोठं वक्तव्य करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अप्रत्यक्ष टोला लगावला. यावेळी त्यांनी, “मी जाहिरातबाजी किंवा शो करणारा नेता नाही. तर आजच्या वर्तमानपत्रात राज्याच्या बाहेरच्या नेत्यांनी जाहिराती छापल्या असल्याचे पाहण्यात आलं आहे. त्याचबरोबर नाशिक शहरामध्ये कार्यकर्त्यांनी बॅनर्स लावले आहेत. परंतु, आपल्या जाहिराती बाहेरच्या राज्यात लावल्या जात नाहीना याची मी माहिती घेतल्याचेही ते म्हणाले. तर अजित पवार यांना नाशकात लागेल्या राष्ट्रवादीच्या बॅनर्सवरून शरद पवार यांचा फोटो गायब झाल्यावरून विचारला असता, शरद पवार आमचं श्रद्धास्थान आहे. त्यामुळे बॅनर्सच माहीत नाही. मात्र, त्यांचा फोटो मी माझ्या केबिनमध्ये लावल्याचे ते म्हणालेत.