अजित पवार पुन्हा येणार? अजितदादा परत येण्याची किती शक्यता? सुप्रिया सुळे म्हणाल्या…
VIDEO | राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या 'दादा आमचे नेते! राष्ट्रवादीमध्ये फूट पडली नाही, तर अजित दादा आमच्या पक्षाचे जेष्ठ नेते आहेत' पडद्यामागे वेगळं घडतंय का?
मुंबई, २४ ऑगस्च २०२३ | अजित पवार यांच्या बंडानंतर काका-पुतण्यांच्या भेटी गाठी झाल्यात. यानंतर आता सुप्रिया सुळे यांना मोठा गौप्यस्फोट केलाय. राष्ट्रवादीमध्ये फूट पडली नाही, तर अजित दादा आमच्या पक्षाचे जेष्ठ नेते आणि आमदार आहेत, असे सुप्रिया सुळे म्हणाल्यानंतर पडद्यामागे वेगळं घडतंय का? अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे. दरम्यान, अजित पवार पुन्हा शरद पवार यांच्याकडे येणार की काय, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्यात. ‘भाजपने आतापर्यंत राष्ट्रवादी फोडण्यासाठी ३ वेळा प्रयत्न केलेत. यावेळी भाजपला यश लाभलं ते राष्ट्रवादी फोडण्यात यशस्वी झाले. राष्ट्रवादी फोडण्यासाठी भाजप त्यांची रणनिती सतत बदलत राहिलं. पण तिसऱ्या वेळी राष्ट्रवादी फोडण्यासाठी भाजपची खूप सखोल योजना होती.’ असा मोठा गौप्यस्पोट एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सुप्रिया सुळे म्हणाल्या.