Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajit Pawar : झालेल्या चुका सुधारा..., अजित पवारांनी महिला कार्यकर्त्याला  झापलं, दादा बीडमध्ये बघा काय-काय घडलं?

Ajit Pawar : झालेल्या चुका सुधारा…, अजित पवारांनी महिला कार्यकर्त्याला झापलं, दादा बीडमध्ये बघा काय-काय घडलं?

| Updated on: Apr 02, 2025 | 1:57 PM

पुतळ्यासाठी परवानगी देण्याची मागणी करणाऱ्यावर अजित पवार संतापले. महापुरूषांबद्दल माझ्या मनात आदराची भावना आहे. पण हे पुतळ्यांचं शहर करायचं आहे का? असा सवाल करत अजित पवार त्या महिला कार्यकर्त्यावर भडकले.

बीड दौऱ्यावर असताना अजित पवार यांना निवदेन देण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली. बीडमध्ये पुतळ्यासाठी परवानगी मिळावी यासाठी निवेदन घेऊन आलेल्या महिला कार्यकर्त्यावर अजित पवार भडकले. बीडला पुतळ्यांचं शहर बनवायचं आहे का? असा संतप्त सवाल केला.  ‘हे पुतळ्यांचं शहर होईल. माझी बारामती घ्या.. बघा किती पुतळे आहेत आणि काय डेव्हलपमेंट आहेत. कुठेतरी आता झालेल्या चुका सुधारून पुढे चला… आता आपण नवीन जनरेशनकरता करू ना’, असं अजित पवार यांनी बीडमध्ये वक्तव्य करत एका महिला कार्यकर्त्याला झापलं असल्याचे पाहायला मिळालं. बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना अजित पवार यांनी कार्यकत्यांच्या भेठीगाठी घेतल्या. यादरम्यान ते बोलत होते. पुढे अजित पवार असंही म्हणाले, ‘गेल्या अनेक वर्षांपासून इथलं राजकारण मी बघतोय. जातीजातीमध्ये समाज विभागलेला आहे. फूट पाडायची आणि त्यातून राजकीय पोळी भाजायची. विकास त्यातून विकास काहीच नाही. गेल्या कित्येक वर्षात काय विकास झाला? पदं, मंत्रिपदं सगळी मिळाली. आता थोडसं आमचं पण ऐका…तुम्ही दिलं ते निवेदन आणि आता मी अधिकाऱ्यांशी बोलतो.’, असं म्हणत अजित पवार यांनी बीडमधील एका महिला कार्यकर्त्याला चांगलंच खडसावत त्यांना समजवल्याचे पाहायला मिळाले.

Published on: Apr 02, 2025 01:57 PM