सत्ता दिली, मंत्री केलं तरी… अजित पवार यांना शरद पवार यांचा थेट इशारा अन् काय केलं सूचक व्यक्तव्य?
बारामतीतील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना अजित पवार यांच्यावर शरद पवार यांनी निशाणा साधलाय. काही जण सत्तेसाठी तर काही जण भितीपोटी भाजपसोबत सत्तेत गेल्याचे शरद पवार यांनी म्हटलंय. कर्तृत्व असतानाही सुप्रिया सुळे यांना मंत्री केलं नाही. तिला बाजूला ठेवल्याचे त्यांनी म्हटलं. शरद पवार यांनी अजित पवार यांना उद्देशून बघा काय म्हटलं...
मुंबई, २० डिसेंबर २०२४ : शरद पवार यांनी अजित पवार यांना थेट इशारा दिलाय. सत्ता दिली, मंत्री केलं तरी सोडून गेलेत. मात्र १९८० साली जे सोडून गेलेत त्यांचा निवडणुकीत पराभव झाला. असं सूचक वक्तव्य शरद पवार यांनी केलं. बारामतीतील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना अजित पवार यांच्यावर शरद पवार यांनी निशाणा साधलाय. काही जण सत्तेसाठी तर काही जण भितीपोटी भाजपसोबत सत्तेत गेल्याचे शरद पवार यांनी म्हटलंय. पुढे ते असेही म्हणाले, १९८० मध्ये इंग्लंडला गेलो. त्यावेळी ७० आमदार होते. पण परत आल्यावर ६२ आमदार सोडून गेले होते. मात्र त्यानंतरच्या निवडणुकीत ५८ आमदारांना घरी बसवलं. हीच स्थिती येत्या निवडणुकीत दिसेल, असे पवारांनी म्हटलंय. कार्यकर्त्यांशी चर्चा करताना आपल्या मनातील भावनाही बोलून दाखवली. कर्तृत्व असतानाही सुप्रिया सुळे यांना मंत्री केलं नाही. तिला बाजूला ठेवल्याचे त्यांनी म्हटलं. शरद पवार यांनी अजित पवार यांना उद्देशून बघा काय म्हटलं…