शिंदेंसमोर अजितदादांचा मुख्यमंत्रिपदाबाबत गौप्यस्फोट, म्हणाले … तर संपूर्ण पक्षच फोडला असता
ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्या जीवनावर आधारित एका पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. दरम्यान, या कार्यक्रमातच अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्या समोरच मुख्यमंत्रीपदाबाबत मोठं वक्तव्य केलं. तर यावेळी अजित पवारांसह देवेंद्र फडणवीस यांनी तुफान फटकेबाजी केली.
अजित पवार यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत एकनाथ शिंदेंसमोरच मोठा गौप्यस्फोट केला आहे. मुख्यमंत्रीपदाबाबत अजित पवार आपला संपूर्ण पक्ष घेऊन भाजपसोबत जाण्यास तयार होते. एकनाथ शिंदे यांच्यासमोरच हे वक्तव्य केल्यानं राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्या जीवनावर योद्धा कर्मयोगी एकनाथ सयाजीराव शिंदे या पुस्तकाचा प्रकाश सोहळा पार पडला. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते ‘योद्धा कर्मयोगी एकनाथ शिंदे’ या चरित्रग्रंथाचे ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे प्रकाशन सोहळा झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कौटुंबिक वाटचाल, त्यांची जडणघडण, त्यांचा संघर्ष, कष्ट, त्यांचे राज्याच्या विकासातील योगदान या साऱ्याचा लेखाजोखा या ग्रंथात मांडण्यात आला आहे. या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात अजित पवार यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांनी देखील तुफान फडकेबाजी केली आहे.