VIDEO : Ajit Pawar | सुट्टीच्या दिवशीही अधिकारी सहकार्य करतात

| Updated on: Aug 06, 2022 | 2:52 PM

आम्ही आरोप करत नाही. वस्तुस्थिती आहे. शपथविधी होऊन 35 दिवसांपेक्षा जास्त दिवस झालेत. तरी मंत्रिमंडळ विस्तार होत नाही. मुखमंत्र्यांनी लवकर करू लवकर करू, हे सांगायचे बंद करावे, अशी नाराजी विरोधीपक्ष नेते अजित पवार  यांनी व्यक्त केली आहे.

आम्ही आरोप करत नाही. वस्तुस्थिती आहे. शपथविधी होऊन 35 दिवसांपेक्षा जास्त दिवस झालेत. तरी मंत्रिमंडळ विस्तार होत नाही. मुखमंत्र्यांनी लवकर करू लवकर करू, हे सांगायचे बंद करावे, अशी नाराजी विरोधीपक्ष नेते अजित पवार  यांनी व्यक्त केली आहे. ते पुण्यात बोलत होते. अजित पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सोमवार पेठेतील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन झाले. त्यानंतर त्यांना माध्यमांशी संवाद साधत राज्य सरकारवर टीका केली. सुट्टीच्या दिवशीही अधिकारी सहकार्य करतात, असे मोठे विधान अजित पवार यांनी केले आहे. मीडिया यांना विचारतो, कधी? हे म्हणतात लवकरच, लवकरच, लवकरच. आम्ही दोघे आहोत, आम्ही दोघे आहोत. मला त्या दोघांच्यावर टीका करायची नाही. या दोघांच्या हातात काही नाही. दिल्लीत सर्व ठरते. 

Published on: Aug 06, 2022 02:52 PM