दादांचे आमदार निलेश लंके पुण्यात आले पण शरद पवार गटातील प्रवेश लांबला? काय कारण?
पुण्यात त्यांचा प्रवेश होणार अशीही चर्चा होती. मात्र लंके पुण्यात गेले त्यांनी शरद पवार यांनी भेटही घेतली पण अचानक प्रवेश लांबला... राजकारणात काय होईल हे सांगता येत नाही, असं निलेश लंके म्हणताय. पण हेच निलेश लंके अजित दादांची साथ सोडणार?
मुंबई, १२ मार्च २०२४ : अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके हे शरद पवार गटात जाणार अशी चर्चा जोरदार रंगली आहे. पुण्यात त्यांचा प्रवेश होणार अशीही चर्चा होती. मात्र लंके पुण्यात गेले त्यांनी शरद पवार यांनी भेटही घेतली पण अचानक प्रवेश लांबला… राजकारणात काय होईल हे सांगता येत नाही, असं निलेश लंके म्हणताय. पण हेच निलेश लंके अजित दादांची साथ सोडून शरद पवार यांच्या गटात जाणार यासाठी ते पुण्यात आले होते, अशी चर्चा होती. शरद पवार गटाचे पुण्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी निलेश लंकेंचं तसं स्वागतही केलं. मात्र त्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला नाही तर तो लांबला. सकाळपासून पुण्यात लंके हे दाखल झाले होते. सकाळी ९ वाजता त्यांनी मोदी बागेत शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर पवारांनी १० वाजता पत्रकार परिषद घेतली. पवारांच्या भेटीनंतर लंके अमोल कोल्हे यांच्या भेटीस गेले. या भेटीनंतर आमदार निलेश लंके मतदारसंघाकडे रवाना झाले. बघा स्पेशल रिपोर्ट नेमकं काय घडलं?