Aasha Pawar : पवार कुटुंब एकत्र येणार? अजितदादांच्या आईचं विठुरायाच्या चरणी साकडं, बघा काय म्हणाल्या?
नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आशा पवार या पंढरपुरात दाखल झाल्याचे पाहायला मिळाले. पंढरपुरात दाखल होताच त्यांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले
नव्या वर्षाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आई आशाताई पवार यांनी पंढरपुरात विठुरायाचं दर्शन घेतलं. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आशा पवार या पंढरपुरात दाखल झाल्याचे पाहायला मिळाले. पंढरपुरात दाखल होताच त्यांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले आणि मनोभावे पुजा केली. यावेळी त्यांनी पवार कुटुंबातील सर्व वाट मिटून पवार कुटुंब गुण्यागोविदांनं नांदू दे, असे साकडं विठ्ठलाला घातले. अजित पवार-शरद पवार हे एकत्र यावे यासाठी त्यांनी पांडुरंगाकडे विनंती केल्याचे त्या म्हणाल्या. पांडुरंग आपले गार्हाणे नक्की ऐकणार अशी आशा सुद्धा त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या या प्रार्थनेमुळे कौटुंबिक स्तरावर अजूनही पवार कुटुंबियातील नाळ जुळलेली असल्याचे दिसून आले. गेल्या वर्षी 12 डिसेंबर रोजी शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अजित पवार यांनी दिल्ली येथील निवासस्थानी सहकाऱ्यांसह त्यांची भेट घेतली. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर दोन्ही गट एकत्र येण्याची चर्चा रंगली. पण या केवळ अफवाच असल्याचे दिसून आले.