आजार कुठं झाला त्यांचं औषध शोधा, पराभवानंतर अजितदादांचं चिंतन अन् छगन भुजबळांचे चिमटे
पराभवानंतर आपल्यापासून काही समाज का दुरावले, यावरून अजित पवार गटात मंथन सुरू झालंय. खासकरून मुस्लिम समाज लांब का गेला यावरून चिंतन करण्याची गरज छगन भुजबळ यांनी व्यक्त केली. पण दलित आदिवासी मतदार ४०० पारच्या नाऱ्यानं दुखावला...काय म्हणाले छगन भुजबळ?
वर्धापन दिनानिमित्त अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा मेळावा झाला. त्यामध्ये लोकसभेत झालेल्या पराभवाचं चिंतन करण्यात आलं. यावरूनच मंत्री छगन भुजबळ यांनी चिमटे देखील काढले. पराभवानंतर आपल्यापासून काही समाज का दुरावले, यावरून अजित पवार गटात मंथन सुरू झालंय. खासकरून मुस्लिम समाज लांब का गेला यावरून चिंतन करण्याची गरज छगन भुजबळ यांनी व्यक्त केली. पण दलित आदिवासी मतदार ४०० पारच्या नाऱ्यानं दुखावला हे बोलताना मुस्लिम समाज दुरावण्याचं कारण काय? याबाबत भुजबळ स्पष्टपणे बोलले नाही. वास्तविक प्रचारावेळी अजित पवार गटाचे बाबाजानी दुर्रानींनी याबाबत आवाहन केलं होतं. मात्र यावर अजित पवार गटाने कोणतीच भूमिका घेतली नाही. बघा नेमकी काय बोलून दाखवली होती बाबाजानी दुर्रानींनी खंत?
Published on: Jun 11, 2024 11:05 AM
Latest Videos