कोल्हापुरात शरद पवारांचा महायुतीला दे धक्का? विधानसभेच्यापूर्वी ‘या’ तीन नेत्यांनी घेतली भेट अन्…
कोल्हापूर दोऱ्यात महायुतीच्या तीन नेत्यांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार यांनी भेट घेतली. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील के.पी पाटील, ए.वाय पाटील आणि भाजपचे राहुल देसाई यांनी शरद पवार यांची भेट घेतली. जाणून घ्या कोण आहेत हे तीनही नेते?
कोल्हापूर दोऱ्यात महायुतीच्या तीन नेत्यांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार यांनी भेट घेतली. के.पी पाटील आणि ए.वाय पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतली. यासोबतच भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनी शरद पवार यांची भेट घेतली. महायुतीच्या या तीनही नेत्यांची राधानगरी भुदरगडमधून लढण्याची इच्छा आहे. महायुतीच्या या तीनही नेत्यांची भेट म्हणजे कोल्हापुरात शरद पवारांचा महायुतीला मोठा धक्का असल्याचे म्हटलं जात आहे. अजित पवार गटाचे के. पी पाटील आणि ए. वाय. पाटील तर भाजप नेते राहुल देसाई यांनी शरद पवार यांची आज भेट घेतली. के. पी पाटील हे कोल्हापुरातील बिद्री सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन आहेत. तर ए. वाय. पाटील हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. तर भाजपचे राहुल देसाई हे राधानगरीचे माजी आमदार बजरंग देसाई यांचे पुत्र आहेत.