Chhagan Bhujbal : आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
मंत्री पद न मिळाल्यामुळे छगन भुजबळ यांनी आपली नाराजी उघडपणे जाहीर केली. त्यानंतर भुजबळांना भेटून त्यांची नाराजी दूर करू असं तटकरे आणि प्रफुल्ल पटेल म्हणाले होते. मात्र ना अद्याप तटकरे भुजबळांना भेटले ना प्रफुल्ल पटेल ना स्वतः अजित पवारांनी भुजबळांना संपर्क केला.
नाराज असलेले छगन भुजबळ यांनी आता उद्विग्न प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्याशी बातचित नाही. आता माझ्या भावना मेल्यात अशी उद्विग्न प्रतिक्रिया नाराज भुजबळांनी दिली. मंत्री पद न मिळाल्यामुळे छगन भुजबळ यांनी आपली नाराजी उघडपणे जाहीर केली. त्यानंतर भुजबळांना भेटून त्यांची नाराजी दूर करू असं तटकरे आणि प्रफुल्ल पटेल म्हणाले होते. मात्र ना अद्याप तटकरे भुजबळांना भेटले ना प्रफुल्ल पटेल ना स्वतः अजित पवारांनी भुजबळांना संपर्क केला. त्यामुळे भावना मेल्यात असं भुजबळ म्हणाले. त्याच वेळी अजित दादांनी मतदारांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून सुद्धा भुजबळांनी टीका केली. मतं दिली म्हणजे मालक नाही झाला असं अजित पवार म्हणाले होते. दरम्यान, दोन दिवसांच्या आधी चाकणमध्ये शरद पवारांसोबत भुजबळ एकत्र आले होते. त्यावेळी शरद पवारांनी चिठ्ठीवर भुजबळांना काहीतरी लिहून दिलं होतं. त्यावरून देखील पडदे मैं रेहेने तो असं म्हणत भुजबळांनी सस्पेन्स वाढवला. आता नेमकं पडद्यामागे काय ठेवायचं आहे आणि किती दिवस राहणार ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट