‘लई अवघड हाय गड्या…’, अमोल मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
मोल मिटकरींनी जो फोटो शेअर केला त्यामध्ये बजरंग सोनावणे यांच्यासोबत वाल्मिक कराड बसल्याचे पाहायला मिळत आहे. इतकंच नाहीतर या फोटो सोबत अमोल मिटकरी यांनी लई अवघड हाय गड्या उमगाया "बाप्पा "रं.... असं कॅप्शन दिलं आहे.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी एक ट्वीट करत शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनावणे यांच्यावर सडकून टीका केली आहे. अमोल मिटकरी यांनी एक फोटो शेअर करत बजरंग सोनावणेंना थेट इशारा दिलाय. अमोल मिटकरींनी जो फोटो शेअर केला त्यामध्ये बजरंग सोनावणे यांच्यासोबत वाल्मिक कराड बसल्याचे पाहायला मिळत आहे. इतकंच नाहीतर या फोटो सोबत अमोल मिटकरी यांनी लई अवघड हाय गड्या उमगाया “बाप्पा “रं…. असं कॅप्शन दिलं आहे. तर अमोल मिटकरी यांच्या या फोटोनंतर बजरंग सोनावणे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ‘अमोल मिटकरी यांना फोटो शेअर करणे हे खूप महाग पडेल, तुमचे फोटोही बाहेर येतील.’, असा इशाराही बजरंग सोनावणे यांनी दिला तर पुढे ते असेही म्हणाले, कोण कुठे जातंय? या प्रकऱणातील आरोपी कुठे, कोणाच्या घरी राहिलेत? त्यांच्याबरोबरीचे फोटो ट्वीट करा…असेही म्हणत खोचक टीका केली आहे.