मनसे नेता योगेश चिले यांच्या ‘त्या’ आरोपांवर मिटकरींचा पलटवार; म्हणाले, खंडणीबहाद्दर, टुकार…
'कोण तो चिले त्याचा हात काळा आहे की गोरा आहे? याचं थोबाडही पाहलं नाहीये. कोणीही येतो आणि आरोप करतो. आरोपाला तथ्य असलं पाहिजे. त्याच्याकडे आरोप करतो त्याचं पत्र आहे का? तपासलं पाहिजे. राजा हरीशचंद्राच्या पोटी जन्माला आला का तसेही नाही,' असे म्हणत अमोल मिटकरींनी चिले यांच्यावर हल्लाबोल केलाय.
राज ठाकरे यांना अमोल मिटकरींनी सुपारीबहाद्दर म्हणत टीका केली होती. खरंतर अमोल मिटकरी हे घासलेट चोर आहेत. त्यांचं घासलेटचं रेशनींगचे दुकान होते. त्यांच्यावर कारवाई कारण्यात आली. अशा घासलेट चोराला अजित दादांनी विधानपरिषद आमदारकी दिली, असे म्हणत मनसे नेते योगेश चिले यांनी अमोल मिटकरी यांच्यावर निशाणा साधला होता. यावर अमोल मिटकरींनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘आज या चिलेची ओळख पनवेलमध्ये खंडणी बहाद्दर म्हणून आहे. दुसऱ्याच्या चारित्र्यावर बोलताना आधी आपल्याकडे चार बोट आहे, याचा विचार करायला हवा.. अशा टुकार लोकांना मी उत्तर देत नाही’, असेही अमोल मिटकरी म्हणाले. हॉटेल हयात प्रकरण बाहेर काढेन, असा इशारा योगेश चिले याने दिल्यानंतर अमोल मिटकरी यांनी देखील फटकारले आहे. मिटकरी म्हणाले, त्यांना कोणत्या हॉटेलची नावं काढायची आहेत. त्यांनी ती काढावी, मग आम्हीही खालच्या पातळीवर जाऊ. त्याला त्याची औकात माहिती आहे. तुझा मालक दादांवर बोलला आम्ही उत्तर दिलं तर वैचारिक संघर्ष कर ना बाळा.. असं म्हणत मिटकरींनी पलटवार केलाय.