धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी आता दादांचे आमदार एकवटले? ‘या’ आमदारांची आग्रही मागणी
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या प्रकाश सोळंके यांनी मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा जाहीरपणे मागितला. पण फक्त प्रकाश सोळंकेच नाहीतर मराठवाड्यातील अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या सर्वच आमदारांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केल्याचे सूत्रांकडून कळतंय
आतापर्यंत बीड जिल्ह्यातील लोक प्रतिनिधींनी मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली. मात्र आता मराठवाड्यातील राष्ट्रवादीच्या सर्वच आमदारांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या प्रकाश सोळंके यांनी मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा जाहीरपणे मागितला. पण फक्त प्रकाश सोळंकेच नाहीतर मराठवाड्यातील अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या सर्वच आमदारांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केल्याचे सूत्रांकडून कळतंय. येत्या काळात मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागू शकते. तसंच एकाधिकारशाही मोडीत काढण्यासाठी धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी अजित पवार यांच्याकडे राष्ट्रवादीच्या आमदारांनी केल्याची सूत्रांकडून मिळतेय. तर मुंडेंचा राजीनामा मागणारे अजित पवार यांचे ते आमदार मर्दांची औलाद असल्याचे जितेंद्र आव्हाड म्हणाले. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या आमदारांमध्ये बाबासाहेब पाटील, त्यानंतर संजय बनसोडे, यासह आमदार राजू नावघरे, राजेश विटेकर आणि प्रकाश सोळंके हे मराठवाड्यातील अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत. एकदिवस आधीच भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी एसआयटीचा रिपोर्ट आल्यानंतर पुढचे निर्णय घेतले जातील असे संकेत दिलेत. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट…