राज्यसभेवर खासदार तरीही पुन्हा उमेदवारी, प्रफुल्ल पटेलांना तिकीट नव्यानं देण्यामागं दादांची रणनीती!

राज्यसभेवर खासदार तरीही पुन्हा उमेदवारी, प्रफुल्ल पटेलांना तिकीट नव्यानं देण्यामागं दादांची रणनीती!

| Updated on: Feb 16, 2024 | 11:12 AM

राज्यातील सहा जागांपैकी सर्वाधिक चर्चा ही प्रफुल्ल पटेल यांच्या तिकीटावर होतेय. राज्यसभेवर खासदार असताना देखील पुन्हा प्रफुल्ल पटेल यांना तिकीट मिळालंय. तर काही दिवसात सर्व काही कळेल असं सूचक विधानही पटेलांनी केलंय.

मुंबई, १६ फेब्रुवारी २०२४ : महाराष्ट्रातून राज्यसभेच्या सहा जागांवर उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर याचे अर्जही भरण्यात आलेत. या सहा जागांपैकी सर्वाधिक चर्चा ही प्रफुल्ल पटेल यांच्या तिकीटावर होतेय. राज्यसभेवर खासदार असताना देखील पुन्हा प्रफुल्ल पटेल यांना तिकीट मिळालंय. तर काही दिवसात सर्व काही कळेल असं सूचक विधानही पटेलांनी केलंय. दरम्यान, राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहा जागांसाठी महायुतीचे पाच उमेदवार तर काँग्रेसच्या चंद्रकांत हांडोरे यांनी राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरलाय. भाजपकडून अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि अजित गोपछडे तर शिंदेंच्या शिवसेनेकडून मिलिंद देवरा, अजित दादांकडून प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसकडून चंद्रकांत हांडोरे यांनी अर्ज दाखल केला. विशेषमध्ये एकानं अपक्ष अर्ज दाखल केलाय. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: Feb 16, 2024 11:12 AM