अमोल मिटकरी यांचा पक्षालाच थेट इशारा, बघा नेमकं काय म्हणाले?
tv9 marathi Special Report | अकोला येथे झालेला अजित पवार गटाचा पदाधिकारी मेळावा अमोल मिटकरी यांच्या नाराजीनाट्यानं चांगलाच चर्चेत आहे. अकोला येथे अजित पवार गटाच्या पदाधिकारी मेळाव्यात निवडीवरुनच गोंधळ उडाला. अमोल मिटकरी यांनी एका पक्षप्रवेशावरुन पक्षालाच दिला थेट इशारा
मुंबई, ६ ऑक्टोबर २०२३ | अकोला येथे अजित पवार गटाचा पदाधिकारी मेळावा झाला. पण हा मेळावा अमोल मिटकरी यांच्या नाराजीनाट्यानं चर्चेत राहिला आहे. नेमकं काय घडलं इथं? आणि अमोल मिटकरी यांनी एका पक्षप्रवेशावरुन काय इशारा दिला जाणून घेऊया… अकोला येथे अजित पवार गटाच्या पदाधिकारी मेळाव्यात निवडीवरुनच गोंधळ झाला. हा सारा वाद खुद्द ज्येष्ठ मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यासमोरच घडला. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. या वादाचं कारण म्हणजे शिवा मोहोळ यांच्या निवड. शिवा मोहोळ हे अकोल्यातले राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत. राष्ट्रवादी फुटीआधीच मोहोळ यांनी अमोल मिटकरी यांच्यावर कमिशनखोरीचा आरोप करुन जयंत पाटील यांच्याकडे तक्रार केली होती. तेव्हापासून मिटकरी-मोहोळांमध्ये वाद आहे. त्यामुळे अशा व्यक्तीच्या निवडीला आपला विरोध आहे, असे म्हणत अमोल मिटकरी यांनी थेट इशाराच दिला आहे.