राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? अजित पवार म्हणाले…
मागच्या काही दिवसांपासून राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला आहे. त्यावरून अजित पवार यांनीही सरकारला टोला लगावला आहे. पाहा काय म्हणालेत...
मागच्या काही दिवसांपासून राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला आहे. त्यावरून सरकारवर टीका केली जातेय. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही सरकारला टोला लगावला आहे. दिल्लीतल्या नेत्यांनी परवानगी दिली की मंत्रिमंडळ विस्तार होईल, असं अजित पवार म्हणाले. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत विचारलं असता त्यांनी हे उत्तर दिलंय. उद्या सादर होणाऱ्या अर्थसंकल्पावरही अजित पवार बोललेत. अर्थसंकल्पात गॅस सिलेंडर दर, रेल्वे प्रकल्प निधी, महागाई याबाबत दिलासा पाहिजे, असंही अजित पवार म्हणालेत.
Published on: Jan 31, 2023 03:03 PM
Latest Videos