छत्तीसगडमधून कोळशाची खाण घेण्याचा विचार सुरू; कोळसा टंचाईवर अजित पवार यांची माहिती

| Updated on: Apr 22, 2022 | 1:45 PM

राज्यात सध्या लोडशेडिंग (Load shedding) सुरू आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे. देशपातळीवर कोळशाची टंचाई आहे. विविध राज्यांत हवा तेवढा कोशळाचा (Coal) पुरवठा होत नाही.

राज्यात सध्या लोडशेडिंग (Load shedding) सुरू आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे. देशपातळीवर कोळशाची टंचाई आहे. विविध राज्यांत हवा तेवढा कोशळाचा (Coal) पुरवठा होत नाही. त्यामुळे परदेशातूनही कोळसा आयात करण्याचा निर्णय झाला आहे. शिवाय छत्तीसगडमधील खाणच घेण्याचा विचार राज्य सरकारकडून सुरू आहे. त्यासाठी ऊर्जामंत्री नितीन राऊत प्रयत्न करत आहेत. सोनिया गांधींनीही यात छत्तीसगड राज्य सरकारला याविषयीची विनंती केली आहे, अशी माहिती अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली आहे.

Published on: Apr 22, 2022 01:45 PM