“…म्हणून केसरकरांनी मला ऑफर दिली असेल” : ‘तो’ किस्सा सांगत अजित पवारांची प्रतिक्रिया
काही दिवसांपूर्वी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना सरकारमध्ये येण्याची खुली ऑफर दिली होती. "अजित पवार यांच्याबदद्ल अतिशय आदर आहे. ते विरोधी पक्षाचे जबाबदार नेते आहेत. त्यामुळे अजित पवार यांनी सरकारमध्ये यावं, अशी आमची अपेक्षा आहे. ते सोबत आले तर आम्हाला आनंद होईल", अशी ऑफर दीपक केसरकर यांनी अजित पवार यांना दिली.केसरकरांच्या या ऑफरवर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली.
औरंगाबाद : काही दिवसांपूर्वी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना सरकारमध्ये येण्याची खुली ऑफर दिली होती. “अजित पवार यांच्याबदद्ल अतिशय आदर आहे. ते विरोधी पक्षाचे जबाबदार नेते आहेत. त्यामुळे अजित पवार यांनी सरकारमध्ये यावं, अशी आमची अपेक्षा आहे. ते सोबत आले तर आम्हाला आनंद होईल”, अशी ऑफर दीपक केसरकर यांनी अजित पवार यांना दिली. केसरकरांच्या या ऑफरवर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली. “दीपक केसरकर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना त्यांना आमदारकीचं तिकीट देण्यात मी फार महत्त्वाची भूमिका बजावली होती. तेव्हा ते मंत्री नव्हते. पण आता एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर दीपक केसरकर मुख्यमंत्र्यांच्या अगदी जवळ गेले. केसरकरांना प्रवक्ते पदाची जबाबदारी मिळाली.एकनाथ शिंदेंनी केसरकरांना आता मंत्रीही केलं आहे. शिक्षणाची महत्त्वाची जबाबदारी आता त्यांच्याकडे आहे. त्यामुळे पूर्वाश्रमीचे असलेले जिव्हाळ्याचे संबंध लक्षात घेता, केसरकरांना आठवण आली असेल आणि त्या आठवणीतून केसरकरांच्या तोंडून ते शब्द बाहेर आले असतील,” असं अजित पवार म्हणाले.