Ajit Pawar | मराठवाड्यात पूरजन्य परिस्थिती, संपूर्ण माहिती मिळाल्यानंतर तातडीनं मदत करणार : अजित पवार

Ajit Pawar | मराठवाड्यात पूरजन्य परिस्थिती, संपूर्ण माहिती मिळाल्यानंतर तातडीनं मदत करणार : अजित पवार

| Updated on: Sep 30, 2021 | 12:08 PM

पावसामुळे मराठवाडा, विदर्भासह (Marathwada Rain) राज्यातील अनेक जिल्ह्यात मोठं नुकसान झालं आहे. त्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून शेतकऱ्यांना भरघोस भरपाई देण्याची मागणी केली जात आहे.

पावसामुळे मराठवाडा, विदर्भासह (Marathwada Rain) राज्यातील अनेक जिल्ह्यात मोठं नुकसान झालं आहे. त्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून शेतकऱ्यांना भरघोस भरपाई देण्याची मागणी केली जात आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना पत्र लिहून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट 50 हजार रुपये भरपाई देण्याची मागणी केली आहे. अशा परिस्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार काय म्हणाले?

वेगवेगळ्या पक्षांकडून वेगवेगळी मागणी केली जातेय. पण महाविकास आघाडीचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी उभी आहे. शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे कसे मिळवता येतील याचे आदेश विमा कंपन्यांना देण्यात आलेत. प्रत्येक पालकमंत्री त्या त्या भागाच्या दौऱ्यावर आहेत. अडचणीतील माणसाला मदत करायचं‌ काम सुरु आहे, असं अजित पवार यांनी सांगितलं.