Ajit Pawar | काम पुर्ण न झाल्यास गाठ माझ्याशी, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना अजित पवारांचा इशारा

Ajit Pawar | काम पुर्ण न झाल्यास गाठ माझ्याशी, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना अजित पवारांचा इशारा

| Updated on: Oct 10, 2021 | 11:51 AM

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हटलं शिस्त आणि वेळेचा काटेकोरपणा या गोष्टी आल्याच. नियम न पाळल्यामुळे अजित पवार यांनी बड्या-बड्या अधिकाऱ्यांना फटकारल्याचे किस्से यापूर्वीदेखील चर्चेत आले आहेत. याची प्रचिती पुन्हा एकदा बारामतीमध्ये आली.

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार म्हटलं शिस्त आणि वेळेचा काटेकोरपणा या गोष्टी आल्याच. नियम न पाळल्यामुळे अजित पवार यांनी बड्या-बड्या अधिकाऱ्यांना फटकारल्याचे किस्से यापूर्वीदेखील चर्चेत आले आहेत. याची प्रचिती पुन्हा एकदा बारामतीमध्ये आली. मी वैद्यकीय महाविद्यालयाबद्दल सूचना केल्या आहेत. त्याची नोंद संबंधित विभागाने घेतली असेल. आता मी त्यावर लक्ष ठेवेल. नाहीतर एखाद्या दिवशी पहाटे पाचलाच येऊन बघतो. काम सुरु आहे की नाही हे चेक करतो, असे म्हणत अजित पवार यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना कर्तव्य बजावण्याचे सूचित केले.

Published on: Oct 10, 2021 11:50 AM