Ajit Pawar : मीरा बोरवणकर यांनी केलेल्या आरोपांवर अखेर अजित पवार बोलले, म्हणाले…
VIDEO | पुण्यातील येरवड्यातील पोलिसांच्या जमिनीच्या लिलावाचा दादांनी निर्णय घेतला होता, माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी नाव न घेता अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मीरा बोरवणकर यांनी केलेल्या गंभीर आरोपांवर अजित पवार यांनी सांगितला घटनाक्रम
मुंबई, १७ ऑक्टोबर २०२३ | पुण्यातील येरवड्यातील पोलिसांच्या जमिनीच्या लिलावाचा दादांनी निर्णय घेतला होता, माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी नाव न घेता अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मीरा बोरवणकर यांनी केलेल्या आरोपांवर अखेर अजित पवार यांनी मौन सोडले आहे. यावेळी २००८ मध्ये राज्य शासनाने काढलेला एक जीआर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सादर केला. अजित पवार माध्यमांशी बोलताना म्हणाले, त्या बातमीशी किंवा प्रकरणाशी माझा काहीच संबंध नाही. एका निवृत्त आयपीएस अधिकाऱ्यांनी एक पुस्तक लिहिलं आणि त्यात माझ्यावर आरोप केलेत. मीडियात बातम्या आल्या की अजित पवार अडचणीत त्यांच्यावर कारवाई करा. पण मी यात काहीही केलं नाही, असा दावा अजित पवार यांनी केला. तर याप्रकरणी तत्कालीन विभागीय आयुक्त दिलीप बंड यांनी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर स्पष्टीकरण दिले असल्याचे अजितदादा म्हणाले.