येरवड्याच्या जमिनीवरून नेमकं काय घडलं? अजितदादांनी मीरा बोरवणकर यांनी केलेले ‘ते’ आरोप फेटाळले
tv9 Marathi Special Report | माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकरांनी आपल्या पुस्तकातून अजित दादांवर जमिनीवरुन आरोप केले. येरवड्याच्या पोलिसांच्या जमीनी संदर्भातील आरोपांनंतर अजित पवार गटानं बोरवणकरांचे आरोप फेटाळत अब्रू नुकसानीचा दावा ठोकण्याचा इशारा दिलाय
मुंबई, १७ ऑक्टोबर २०२३ | पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकरांनी आधी आपल्या पुस्तकातून अजित दादांवर जमिनीवरुन आरोप केले. येरवड्याच्या पोलिसांची जमीन बिल्डरांना देण्यास दादांनी सांगितलं, असं बोरवणकर म्हणाल्या होत्या. त्यानंतर अजित पवार गटानं आरोप फेटाळत अब्रू नुकसानीचा दावा ठोकण्याचा इशारा दिला. मात्र पत्रकार परिषदेत घेऊन आपण आरोपांवर ठाम असल्याचं बोरवणकरांनी सांगितलंय. मॅडम कमिश्नर या पुस्तकातून आरोप केल्यानंतर, बोरवणकरांनी पत्रकार परिषदही घेतली. 2010 मध्ये, येरवडा पोलिसांची 3 एकर जागा खासगी बिल्डरांना द्या, असं तत्कालीन पालकमंत्री अजित पवारांनी सांगितलं. मात्र, त्यास आपण विरोध केल्याचं बोरवणकर म्हणाल्यात. तर दादा पुण्याचे पालकमंत्री होते, त्यावेळी राज्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील होते. त्यावेळी आर आर पाटलांनीही आपल्याला मॅडम, ह्यात पडू नका असं म्हटल्याचं बोरवणकर म्हणतायत. मात्र मीरा बोरवणकरांचे आरोप तत्कालीन विभागीय आयुक्त दिलीप बंड यांनी फेटाळलेत. बघा स्पेशल रिपोर्ट…