या निवडणुकीत काय होणार? हे ब्रह्मदेवही सांगू शकणार नाही; अजितदादा नेमकं काय म्हणाले?

या निवडणुकीत काय होणार? हे ब्रह्मदेवही सांगू शकणार नाही; अजितदादा नेमकं काय म्हणाले?

| Updated on: May 28, 2024 | 4:45 PM

या निवडणुकीत काय होणार? हे ब्रह्मदेवही सांगू शकणार नाही असे वक्तव्यही अजितदादांनी केले आहे. तर उद्धव ठाकरे यांच्यापासून लांब असणारा अल्पसंख्याक समाज यंदा ठाकरे गटासोबत आहे, असं वक्तव्य काल अजित पवार यांनी पक्षाच्या मेळाव्यात बोलत असताना केलं. बघा काय म्हणाले अजितदादा?

देशात लोकसभा निवडणुकीचा आणखी एक टप्पा बाकी आहे. तर 4 जूनला या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. मात्र अजित पवार यांच्या एका वक्तव्याने 10 जूनची तारीख चर्चेत आली आहे. तर निकालापूर्वीच 10 जूनची तारीख चर्चेत आल्याने शपथविधीचा मुहूर्त निघाला का? अशी चर्चा सुरू झाली आहे. दुसरीकडे या निवडणुकीत काय होणार? हे ब्रह्मदेवही सांगू शकणार नाही असे वक्तव्यही अजितदादांनी केले आहे. तर उद्धव ठाकरे यांच्यापासून लांब असणारा अल्पसंख्याक समाज यंदा ठाकरे गटासोबत आहे, असं वक्तव्य काल अजित पवार यांनी पक्षाच्या मेळाव्यात बोलत असताना केलं. तर अजित पवार यांनी केलेल्या या वक्तव्यावर काँग्रेस नेते नाना पटोले यांनी पलटवार करत हल्लाबोल केला आहे. अजित पवार यांना आता देव आठवतात म्हणजे तडीपार समजा, असं वक्तव्य करत नाना पटोले यांनी खोचक निशाणा साधला आहे. यावेळी नाना पटोले असेही म्हणाले, मतदान हे ब्रह्मदेव करत नाही तर जनता मतदान करते. तर जनताच याला उत्तर देणार असल्याचे म्हणत नाना पटोले यांनी अजित पवार आणि महायुतीवर सडकून टीका केली आहे.

Published on: May 28, 2024 04:45 PM