फक्त जरंडेश्वर कारखाना विकला गेला नाही, पत्रकार परिषद घेऊन सगळं स्पष्ट करणार : अजित पवार

फक्त जरंडेश्वर कारखाना विकला गेला नाही, पत्रकार परिषद घेऊन सगळं स्पष्ट करणार : अजित पवार

| Updated on: Oct 21, 2021 | 2:53 PM

राज्यात फक्त जरंडेश्वर साखर कारखाना विकला गेला नाही. कुणाच्या कारकिर्दीत किती कारखाने विकले गेले हे माहिती आहे. एक दोन नाही तर साठ ते सत्तर साखर कारखाने विकले गेले असल्याचं अजित पवार म्हणाले.

राज्यात फक्त जरंडेश्वर साखर कारखाना विकला गेला नाही. कुणाच्या कारकिर्दीत किती कारखाने विकले गेले हे माहिती आहे. एक दोन नाही तर साठ ते सत्तर साखर कारखाने विकले गेले असल्याचं अजित पवार म्हणाले. माझ्याकडे सगळं रेकॉर्ड आहे, मी आज किंवा उद्या पत्रकार परिषद घेणार आहे. बिल्डर, शेतकरी, राजकीय क्षेत्राशी संबंधित असलेल्या लोकांनी साखर कारखाने घेतले आहेत. राज्यात 60 ते 70 कारखाने विकले गेले आहेत. लवकरच पत्रकार परिषद घेऊन याविषयी बोलणार असल्याचं अजित पवार म्हणाले. काही लोकांनी माझ्याविषयी गरळ ओकण्याचं काम केलं. 1990 पासून महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक जीवनात मी काम करतोय. मला संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो, पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात बोलणार आहे, असं अजित पवार म्हणाले.