पुण्यातील शाळा आणि कॉलेज 1 फेब्रुवारीपासून सुरु होणार: अजित पवार
पुण्यातील शाळा आणि महाविद्यालयं 1 फेब्रुवारीपासून शाळा सुरु होणार आहेत. विद्यार्थ्यांचं लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. पहिली ते आठवीचे वर्ग चार तास सुरु राहतील, असं अजित पवार म्हणाले.
पुण्यातील शाळा आणि महाविद्यालयं 1 फेब्रुवारीपासून शाळा सुरु होणार आहेत. विद्यार्थ्यांचं लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. पहिली ते आठवीचे वर्ग चार तास सुरु राहतील, असं अजित पवार म्हणाले. तसेच विद्यार्थ्यांनी मास्क काढूच नये हा सुद्धा त्यामागचा हेतू आहे. इयत्ता पहिली ते 8 वी हाफ डे आणि नववी ते दहावी पूर्णवेळ शाळा सुरू राहील, असंही ते म्हणाले. तसेच नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांचं लसीकरण करण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांचं शाळेतच लसीकरण केलं जाणार आहे. याबाबतची माहिती शाळा चालक आणि संचालकांना देण्यात येणार आहे, असंही त्यांनी सांगितलं. अजित पवार आज पुण्यात होते. पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. गेल्या दोन दिवसांपासून पुण्यातील कोरोना संसर्ग कमी झाल्याचंही त्यांनी सांगितलं.