कांद्यानं दिल्लीचं सरकार गेलं, अजित पवार यांनी लोकांना का करून दिलं आठवण

कांद्यानं दिल्लीचं सरकार गेलं, अजित पवार यांनी लोकांना का करून दिलं आठवण

| Updated on: Mar 07, 2023 | 4:58 PM

कांद्याच्या दरावरूनच दिल्लीचं सरकार गेलं होतं. आपल्याकडे जे सध्या सुरू आहे तसेच कांद्याच्या दरावर तेथे सुरू होतं आणि दिल्लीचं सरकार गेलं.

अहमदनगर : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अहमदनगरमध्ये बोलताना कांद्यानं दिल्लीचं सरकार घालवल असं म्हणत थेट इशारा देत जनता सरकार घालवू शकते, सरकार बदलू शकते असं म्हटलं आहे. यावेळी त्यांनी कांद्याचा तर वांदाच झाला आहे. आपल्याकडेही जिरायत शेती होते तेथे कांदा मोठ्या प्रमाणावर पिकवला जातो. दोन पैसे मिळवून देणारं पिक म्हणून याकडे पाहिलं जातं. त्यावरूनच सांगतो दिल्लीचं सरकार गेलं होतं. आपल्याकडे जे सध्या सुरू आहे तसेच कांद्याच्या दरावर तेथे सुरू होतं आणि दिल्लीचं सरकार गेलं. म्हणजे लोकांनी मनात आणलं तर सरकार घालवू शकतात. एवढी ताकद मतदाराच्या मतात आहे असेही अजित पवार म्हणाले.

Published on: Mar 07, 2023 04:58 PM