Ajit Pawar | प्रभाग रचना सुधारणेवरून कोणाचीही नाराजी नाही, अजित पवारांचं स्पष्टीकरण

Ajit Pawar | प्रभाग रचना सुधारणेवरून कोणाचीही नाराजी नाही, अजित पवारांचं स्पष्टीकरण

| Updated on: Sep 30, 2021 | 1:33 PM

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रभागरचनेवरुन सरकारमध्ये कोणताही मतभेद नसल्याचं म्हटलं आहे. प्रभागरचनेवर सगळ्यांनी वेगवेगळी मत मांडली. काही जणांनी 2 सदस्यीय, 3 सदस्यीय आणि 4 सदस्यीय प्रभागरचना असावी, असं मत मांडलं होतं.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रभागरचनेवरुन सरकारमध्ये कोणताही मतभेद नसल्याचं म्हटलं आहे. प्रभागरचनेवर सगळ्यांनी वेगवेगळी मत मांडली. काही जणांनी 2 सदस्यीय, 3 सदस्यीय आणि 4 सदस्यीय प्रभागरचना असावी, असं मत मांडलं होतं. मात्र, सर्वांचं ऐकून घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी निर्णय घेतला असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं आहे. राज्य सरकारकडून प्रभागरचनेचा अध्यादेश राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवला आहे.

महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी

वेगवेगळ्या पक्षांकडून वेगवेगळी मागणी केली जातेय. पण महाविकास आघाडीचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी उभी आहे. शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे कसे मिळवता येतील याचे आदेश विमा कंपन्यांना देण्यात आलेत. प्रत्येक पालकमंत्री त्या त्या भागाच्या दौऱ्यावर आहेत. अडचणीतील माणसाला मदत करायचं‌ काम सुरु आहे, असं अजित पवार यांनी सांगितलं.

तलावातला गाळ जिथं कँचमेंट एरिया आहे तिथं टाकला जाऊ नये. आता संकट आहे त्यामुळं त्यावर चर्चा करता नंतर करता येईल, असं अजित पवार म्हणाले.