...म्हणून मी भाजपसोबत गेलो; अजित पवार यांनी पुन्हा स्पष्टच सांगितलं

“…म्हणून मी भाजपसोबत गेलो”; अजित पवार यांनी पुन्हा स्पष्टच सांगितलं

| Updated on: Aug 07, 2023 | 12:59 PM

उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत. अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक विषयावर भाष्य केलं. आपण भाजपसोबत का गेलो यांचं पुन्हा एकदा स्पष्टीकरण अजित पवार यांनी केलं.

पुणे, 7 ऑगस्ट 2023 | उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत. अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक विषयावर भाष्य केलं. आपण भाजपसोबत का गेलो यांचं पुन्हा एकदा स्पष्टीकरण अजित पवार यांनी केलं. ते म्हणाले की, “राज्याचा विकास करण्यासाठी मी भाजपसोबत आलो आहे. सध्या देशाचे नेतृत्व करणाऱ्यांमध्ये मोदी यांच्याशिवाय दुसरा कोणताच नेता मला दिसत नाही. माणसाच्या अनुभवातून वेगवेगळी मत होऊ शकतात. अमित शाह यांच्यासोबत महायुतीसंदर्भात रविवारी झालेल्या बैठकीत चर्चा झाली. यासंदर्भात अजून काही बैठका होणार आहेत. परंतु आमची जास्त चर्चा राज्याच्या विकासावर झाली. राज्यातील इथेनॉल संदर्भात जे प्रस्ताव असतील ते पाठवा, असे अमित शाह यांनी सांगितले.तसेच पुण्यात विविध प्रकल्पांवर चर्चा झाली. पुणे मेट्रो, वाघोली रोड, चांदणी चौक यासारखे अनेक प्रकल्प राबण्यासाठी दूरगामी योजना करण्याची सूचना अमित शाह यांनी केली.”

Published on: Aug 07, 2023 12:59 PM