Ajit Pawar: दादा ओ दादा! दादा बोलले, प्रेक्षक हसले...

Ajit Pawar: दादा ओ दादा! दादा बोलले, प्रेक्षक हसले…

| Updated on: Jul 16, 2022 | 12:42 PM

Ajit Pawar: वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडत असताना कार्यक्रमात वृक्षारोपण विषयाला धरून लावणी सादर करण्यात आली. ही लावणी गाऊन सादर केली गेली तेव्हा भाषणात बोलताना अजित पवार म्हणाले...

बारामती : बारामतीत वृक्षारोपणाचा (Baramati Tree Plantation) कार्यक्रम पार पडला. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी मिश्किल टिप्पणी केलीये. अजित पवारांचं मजेदार भाषण ऐकून प्रेक्षकांमध्ये चांगलाच हशा पिकला. अजित पवारांचं असं मिश्किल भाषण पहिल्यांदा नाही, अनेक वेळा ते मजेशीर भाषण (Ajit Pawar Comedy Speech) करताना दिसून येतात. वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडत असताना कार्यक्रमात वृक्षारोपण विषयाला धरून लावणी सादर करण्यात आली. ही लावणी गाऊन सादर केली गेली तेव्हा भाषणात बोलताना अजित पवार म्हणाले लावणी जर नववारी नेसून, नथ घालून सादर केली गेली असती तर आणखी मजा आली असती. यावर प्रेक्षकांमध्ये एकच हशा पिकला! त्याचबरोबर बारामतीला दर आठवड्याला येण्याचा माझा प्रयत्न असतो. सत्ता असो वा नसो तालुक्याचा विकास याकडे माझं बारकाईने लक्ष असतं. बारामतीत सोयीसुविधा असाव्यात. यासाठी प्रयत्न पुर्णपणे प्रयत्न करणार आहोत. असंही विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले…

 

Published on: Jul 16, 2022 12:42 PM