अजितदादांचा काकांवर निशाणा तर ताईंना आव्हान, शरद पवार गट आणि अजित पवार यांच्यात वार-पलटवार

अजितदादांचा काकांवर निशाणा तर ताईंना आव्हान, शरद पवार गट आणि अजित पवार यांच्यात वार-पलटवार

| Updated on: Feb 17, 2024 | 10:52 AM

बारामतीत कार्यकर्त्यांच्या मेळाव्यातून वरिष्ठ वरिष्ठ म्हणत शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. इतकंच नाहीतर बहिणीलाही थेट आव्हान दिलंय. माझं कुटुंब सोडलं तर बाकीचे माझ्याविरोधात प्रचार करतील आणि एकटं पाडण्याचा प्रयत्न होईल, असे अजित पवार म्हणाले.

मुंबई, १७ फेब्रुवारी २०२४ : बारामतीत कार्यकर्त्यांच्या मेळाव्यातून काका शरद पवार यांच्यावर निशाणा साधला तर बहिण सुप्रिया सुळे यांना लोकसभा निवडणुकीवरून आव्हान दिलंय. तर सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार लोकसभा निवडणुकीचे उमेदवार असतील असे संकेतही देण्यात आले आहे. बारामतीत कार्यकर्त्यांच्या मेळाव्यातून वरिष्ठ वरिष्ठ म्हणत शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. इतकंच नाहीतर बहिणीलाही थेट आव्हान दिलंय. माझं कुटुंब सोडलं तर बाकीचे माझ्याविरोधात प्रचार करतील आणि एकटं पाडण्याचा प्रयत्न होईल, असे अजित पवार म्हणाले. आपण वरिष्ठांच्या पोटी जन्मलो नाही नाहीतर मीच अध्यक्ष झालो असतो आणि पक्षही माझ्या ताब्यात असता. आताच्या खासदारापेक्षा निवडणून येणारा खासदार जास्त काम करेल असं सांगून स्वतःच्या उमेदवाराच्या विजयाचा दावा केला. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: Feb 17, 2024 10:48 AM