Ajit Pawar: झाडी, डोंगार म्हणणाऱ्या आमदारांना अजित पवारांनी सुनावलं, नेमकं काय म्हणालेत पवार? जाणून घ्या....

Ajit Pawar: झाडी, डोंगार म्हणणाऱ्या आमदारांना अजित पवारांनी सुनावलं, नेमकं काय म्हणालेत पवार? जाणून घ्या….

| Updated on: Jul 04, 2022 | 2:57 PM

'शिवसैनिक नेहमीच ठाकरे कुटुंबाच्या पाठी राहिली आहे, असं सांगतानाच अजित पवार यांनी छगन भुजबळ, नारायण राणे यांची उदाहरणे देत बंडखोरांना घाबरवून सोडले. यावेळी त्यांनी काय डोंगार, काय झाडी, काय हाटील म्हणणाऱ्या सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांनाही सुनावले.

मुंबई: विधानसभेच्या अधिवेशनात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (ajit pawar) यांनी आमदार शहाजी बापू पाटील यांना सुनावलं. शिवसेना नेमकी काय आहे हे सांगतानाच बंडखोर करणारे पुन्हा कधीच निवडून येत नाहीत. हा शिवसेनेचा (shivsena) इतिहास आहे. शिवसैनिक नेहमीच ठाकरे कुटुंबाच्या पाठी राहिली आहे, असं सांगतानाच अजित पवार यांनी छगन भुजबळ, नारायण राणे यांची उदाहरणे देत बंडखोरांना घाबरवून सोडले. यावेळी त्यांनी काय डोंगार, काय झाडी, काय हाटील म्हणणाऱ्या सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांनाही सुनावले. आपण एकाचवेळी निवडून आलो. पाच पाच लाख लोकांचं आपण नेतृत्व करतो, असं सांगत गोव्यात नाचणाऱ्या आमदारांनाही अजितदादांनी फटकारलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर अभिनंदन ठरावावर बोलताना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी हे जोरदार भाषण केलं. अजित पवार यांनी आपल्या स्टाईलमध्ये भाषण करत शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) चिमटे काढले. एवढेच नव्हे तर बंडखोर आमदारांनाही टोले लगावले.

Published on: Jul 04, 2022 02:02 PM