PUNE :  'असे प्रकार चालणार नाहीत तर...', कोयता गँगवरून अजित पवार यांचा पुन्हा इशारा

PUNE : ‘असे प्रकार चालणार नाहीत तर…’, कोयता गँगवरून अजित पवार यांचा पुन्हा इशारा

| Updated on: Jan 15, 2023 | 2:13 PM

गेल्या काही दिवसांपूर्वी पुण्यात कोयत्या गँगच्या धुमाकूळ रोखण्यासाठी पोलिसांनी मास्टर प्लॅन तयार केला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून पुणे शहरातील गुन्हेगारी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. यासंदर्भात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर पुन्हा एकदा अजित पवार यांनी कोयता गँगवरून पोलीस यंत्रणेला इशारा दिला आहे.

कोणीही गुंडगिरी, दहशत माजवता कामा नये. असे प्रकार चालणार नाही तर याची नोंद पोलीस प्रशासनाने घ्यावी आणि असे अढळ्यास थेट कारवाई करा, अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे. तर पुणे बारामतीमध्ये प्रत्येकाला सुरक्षित वाटलं पाहिजे, असेही अजित पवार यांनी म्हटले आहे.

तर गेल्या काही दिवसांपूर्वी पुण्यात कोयत्या गँगच्या धुमाकूळ रोखण्यासाठी पोलिसांनी मास्टर प्लॅन तयार केला. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी पोलीस दलातील उपायुक्त, सहाय्यक आयुक्त आणि पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकार्‍यांची नियुक्त या गँगला रोखण्यासाठी केली.

Published on: Jan 15, 2023 12:00 PM