एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यास अजितदादांचा विरोध अन्…, संजय राऊत यांचा मोठा गौप्यस्फोट
एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यास अजित पवार यांचा विरोध होता. तर एकनाथ शिंदे यांच्या हाताखाली काम करणार नाहीस असं अजित पवार यांनी म्हटलं होतं, असा गौप्यस्फोट करत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना मोठा दावा केला आहे.
मुंबई, ११ डिसेंबर २०२३ : एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यास अजित पवार यांचा विरोध होता. तर एकनाथ शिंदे यांच्या हाताखाली काम करणार नाहीस असं अजित पवार यांनी म्हटलं होतं, असा गौप्यस्फोट करत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना मोठा दावा केला आहे. तर एकनाथ शिंदे यांना त्या सरकार मध्ये मुख्यमंत्री केले असते तर तेव्हा त्यांची भूमिका वेगळी असती, असं संजय राऊत म्हणाले. पण आज एकनाथ शिंदे यांच्या हाताखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकं काम करताय, तीनही बैठकीमध्ये याच लोकांचा हेका होता की, मी एकनाथ शिंदे यांच्या हाताखाली काम करणार नाही. यामध्ये अजित पवार, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, सुनील तटकरे हे होते. ताजमध्ये झालेल्या बैठकीत खाली उतरत असताना लिफ्टमधून उतरत असताना यांनी सांगितलं असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
Published on: Dec 11, 2023 09:24 PM
Latest Videos