अजित दादांच्या पत्नीनं लाटल्या वारक-यांसाठी चपात्या, बघा व्हिडीओ
बारामतीत सुनेत्रा पवार यांनी वारक-यांसाठी चपात्या बनवल्या असल्याचे पाहायला मिळाले. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आज बारामतीचा मुक्कामात आटोपून इंदापूरच्या दिशेने मार्गस्थ झाली आहे. यादरम्यान या सोहळ्यातील वारकरी काही काळासाठी अजित पवारांच्या काटेवाडी गावात विसावल्याचे पाहायला मिळाले.
अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडून पंढरीच्या दिशेने निघालेल्या वारकऱ्यांची सेवा केली जात असल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बारामतीत सुनेत्रा पवार यांनी वारक-यांसाठी चपात्या बनवल्या असल्याचे पाहायला मिळाले. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आज बारामतीचा मुक्कामात आटोपून इंदापूरच्या दिशेने मार्गस्थ झाली आहे. यादरम्यान या सोहळ्यातील वारकरी काही काळासाठी अजित पवारांच्या काटेवाडी गावात विसावल्याचे पाहायला मिळाले. आज अजित पवार आणि सुनेत्रा पवार ही या सोहळ्यात सहभागी झाले इतकंच नाही तर खासदार सुनेत्रा पवार यांनी स्वत: आपल्या हातानी वारक-यांसाठी चपात्या देखील लाटल्या असल्याचे पाहायला मिळाले. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Published on: Jul 07, 2024 06:09 PM
Latest Videos